मंगळवार, मार्च 28, 2023

अतिथी लेखक पोस्ट

कटू आहे पण सत्य आहे …

देशात आलेलं कोरोना महामारीच संकट आणि या महाभयानक संकट काळात आर्थिक परिस्थिती कोडमडलेल्या सामान्य गोरगरीब कुटुंबाच्याकोटुंबिक समस्यांकरीता, उदरनिर्वाहाकरीता आणि कोरोनाग्रस्त रुग्णांच्या इलाजाकरीता हिंदुस्थानासह जगभरातून नामी हस्ती लाखो करोडोरुपयांची आर्थिक मदत जाहीर करत असतांना. सामाजिक बांधिलकी म्हणून आपण या देशाचं..  या समाजाचं काही देणं लागतो किंवा यादेशाचे राजकीय पुढारी या नात्याने या देशातील जनतेकरीता आपलीही काही जबाबदारी आणि काही कर्तव्य आहेत, याचा विसर पडलेल्या वराजकीय खुर्चीच्या लालसेपोटी आणि सत्तेच्या मोहहव्यासापोटी गेली कित्येक वर्षे पैश्याच्या आणि दमदाटीच्या जोरावर निवडणूक जिंकूणसत्तेवर असणाऱ्या .. नसणाऱ्या पण जनतेने ठेवलेल्या फाजील विश्वासामुळे जनतेवर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या व पुढील सात पिढ्याखाऊन उरेल ईतका गडगंज कमावलेल्या पैश्याचा सद्पयोग या महामारीच्या संकट काळात न केलेल्या याच राजकीय पुढारी नेत्यांनी कोरोनामहामारीच्या संकट काळात आर्थिकस्थिती व मनःस्थिती ठासळलेल्या व घाबरलेल्या जनतेच मानसिक मनोबल खच्चीकरणं करण्याबरोबरचप्रशासनाने राबवलेल्या खबदारीच्या उपाय योजना कशा चुकीच्या, खोट्या आणि दुय्यम निष्कामी प्रतीच्या आहेत याबद्दल वारंवार जनतेच्यामनात संभ्रम निर्माण करून जनतेच्या जीवाशी खेळ खेळणारं फालतू घाणेरड्याप्रतीचं राजकारण करतांना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, चिखलफेक करण्यात आणि ऐकामेकांचीउणिधुनी काढण्यात धन्यता समजली व याबद्दल थोडीही लाज शरम व तमा न बाळगणाऱ्या व जनतेच्या सुख दुःखाशी काही देणंघेणं नसलेल्या…  व माणुसकी धर्म विसरलेल्या व निवडणुकीच्या काळात दारोदार भटकणाऱ्या आणि मतदानासाठी गल्लीबोळ्यात पैसे वाटणाऱ्या याराजकीय पुढारी नेत्यांनी कोरोना महामारीच्या चिंताजनक परिस्थितीच्या कठीण काळात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांना  किंवा कोरोनाउपचारा दरम्यान मृत पावलेल्या कारणास्तव आभाळ कोसळल्या रुग्णांच्या कुटुंबाला व बंद उद्योगधंद्यांमुळे आर्थिक परिस्थिती कोलमडलेल्याछोट्या मोठ्या व्यावसायिकांना व महामारीने त्रस्त असलेल्या सामान्य गोरगरीब जनतेला नोकरदारवर्गाला आर्थिक मदतीचा हात म्हणून स्व:कमाईंची  बँकेच्या खात्यात जमा असलेल्या ..  नसलेल्या काळा - सफेद पैशातील एकही छदाम ही मदत म्हणून दिलेली नाही किंवा स्वताच्याखिशातली साधी दमडी ही देशातील किंवा राज्यातील सामान्य गोरगरीब जनतेकरीता त्यांना ती आजगायत मदत म्हणून जाहीर केली किंवाकरावीशी ही वाटली नाही. हेच आपलं खरं दुर्दैव आहे आणि हीच हिंदुस्थानाची खरी शोकांतिका आहे . लेखक - राकेश श्रीधर नारकर  -  २९ / ०४ / २०२१ चिंचपोकळी मुंबई  -  ४०००१२. भ्रमणध्वनी क्रमांक  - ०९७५७४१८६७८

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.