कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात बोलताना बंदवरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. सोबतच त्यांनी अजित पवार यांच्यावरही आपल्या शैलीत ताशेरे ओढले. पेट्रोल डिझेल दरवाढीबद्दल विचारलं असता पाटील म्हणाले की, अजित पवारांनी इंधन जीएसटीमध्ये येऊ दिलं नाही. नाहीतर आता पेट्रोल डिझेल प्रतिलीटर 30 रुपयांनी कमी दरात मिळालं असतं. अजित पवार यांनी इंधन जीएसटीमध्ये आणावं उद्या दर कमी होईल, असं ते म्हणाले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.