औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर केले होते. त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत. शिवाय त्यांना पाठिंबा देणारे दोन पक्ष सोबत आहेत. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेना गंभीर असून हीच ती अनुकूल वेळ असल्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. औरंगाबाद येथे वृत्तवाहिनीशी बोलताना सुभाष देसाई म्हणाले, मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते याबाबत लवकरच निर्णय घेतील. काही तांत्रिक गोष्टी आहेत, मात्र यावरही तोडगा निघेल असे सुभाष देसाई म्हणाले. यापूर्वी विभागीय आयुक्तांना तसा प्रस्तावही पाठवलेला आहे. त्यामुळे आता हीच ती वेळ आहे, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची. याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, असे ते म्हणाले आहेत.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com