
मुंबई : दहावीचा निकाल लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महत्वाचं अपडेट हाती आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मंडळाकडून सांगण्यात आलं आहे की, आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षा covid-19 च्या प्रादुर्भावामुळे सामान्य परिस्थितीत रद्द करण्यात आली. त्यापूर्वी 2019 परीक्षेसाठी प्रवेश होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत 3 एप्रिल रोजी ऑनलाइन प्रवेश पत्र देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व उच्च माध्यमिक शाळांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक अवगत करून दिले आहेत. काही विद्यार्थ्यांना त्यांची बैठक क्रमांक अवगत झाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर सदरची माहिती उपलब्ध करून दिली आहे.
कसा पाहाल आपला बैठक क्रमांक
मंडळाच्या http://mh-hsc.ac.in/ या वेबसाईटवर जा…
वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथं आवश्यक असलेली माहिती म्हणजे आपला जिल्हा, तालुका सिलेक्ट करा.
खालील टॅबमध्ये आधी आडनाव नंतर आपलं नाव मग वडिलांचं नाव अशा स्वरुपात भरा
इंटर केल्यानंतर आपला रोल नंबर आपल्याला दिसेल
निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष
दहावीचा निकाल आठवड्यात लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. 23 जुलैपर्यंत 12 वीचे निकाल बोर्डाकडे पाठवा अशा सूचना सर्व महाविद्यालयांना बोर्डाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही मुदत 24 जुलैपर्यंत वाढवली होती. त्यानंतर पोस्टाने सुद्धा 25 जुलैपर्यंत शाळा निकाल बोर्डाकडे पाठवत होत्या. आता बोर्डाकडे शाळांनी तयार केलेले निकाल आलेत त्यावर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. जुलै अखेर बारावीचा निकाल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. आता पूरपरिस्थितीमुळे निकाल लांबत असल्याची माहिती आहे.
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बारावी परीक्षा रद्द करुन दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण एकत्र करुन अंतर्गत मूल्यपामनद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निकाल तयार करण्याचे काम सुरू असताना मागील तीन ते चार दिवसापासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे निकालाच्या कामात अडचणी येत असून त्यासाठी आणखी चार-पाच दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली होती.
सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शिक्षकांना कॉलेजमध्ये येऊन बारावीच्या निकालाचे काम पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. शिवाय, बारावीच्या शिक्षकांना 23 जुलैपर्यंत मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्याची मुदत दिलेली होती. परंतु हा कालावधी अपुरा असल्यामुळे यामध्ये चार ते पाच दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत होती.महाराष्ट्र शासनाने बारावीच्या शिक्षकांना मूल्यमापन व गुणतक्ते वर्ग शिक्षकाकडे सादर करण्यासाठी सात दिवस तर वर्ग शिक्षकांना परीक्षण व नियमन करण्यासाठी नऊ दिवस दिले होते. मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्यासाठी केवळ पाच दिवस दिलेले असून त्याची मुदत परवा 23 जुलै रोजी संपत होती. त्यानंतर ती मुदत एका दिवसासाठी वाढवली होती. त्यानंतर पोस्टाने सुद्धा 25 जुलैपर्यंत शाळा निकाल बोर्डाकडे पाठवत होत्या. आता बोर्डाकडे शाळांनी तयार केलेले निकाल आलेत त्यावर प्रक्रिया सुरू आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com