मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून २८ ऑक्टोबरपासून १०० टक्के मुंबई उपनगरी सेवा सुरू करण्यात येत आहे. मात्र शासनाने निवडलेल्या श्रेणींनाच एसओपीनुसार प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. उपनगरीय ट्रेनमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, आता दि. २८.१०.२०२१ पासून, मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवा प्री-कोविड स्तरावर म्हणजेच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात १००% चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. २२.३.२०२० पासून कोविड-19 लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.

नंतर दि. १५.६.२०२० पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणींसाठी उपनगरीय सेवा सुरू केल्या. उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या प्रवाशांच्या श्रेणी, नंतर ऑगस्ट २०२१ मध्ये आणि अलीकडच्या आठवड्यात वाढवण्यात आल्या. सध्या, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे अनुक्रमे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात १७०२ आणि १३०४ उपनगरीय सेवा चालवत आहेत ज्या त्यांच्या एकूण उपनगरीय सेवांच्या ९५.७०% आहे. दि. २८.१०.२०२१ पासून, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात प्री-कोविड स्तरावर १००% उपनगरीय सेवा म्हणजेच मध्य रेल्वेवर १७७४ आणि पश्चिम रेल्वेवर १३६७ सेवा चालवतील. फक्त राज्य सरकारने निवडलेल्या श्रेणी आणि त्यांनी जाहीर केलेल्या SOP नुसार प्रवास करण्याची परवानगी आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.