मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी आता एसटी महामंडळ सरसावले आहे. एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या 300 ते 350 कामगारांना सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
या कामगारांनी 24 तासांच्या आत नोकरीवर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आपली तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक रद्द करण्यात येईल, असे या नोटिसीत म्हटले आहे.
मंगळवारी एसटी महामंडळाचे 7,623 कर्मचारी डय़ुटीवर हजर झाले असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 66 बसेस राज्याच्या विविध भागांत सोडण्यात आल्या आणि त्यातून 1852 प्रवाशांनी प्रवास केला. एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे दोन हजार कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महामंडळाने आतापर्यंत एकूण 2,178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.