नागपूर : ओबीसी समाजाची वस्तुनिष्ठ माहिती २०२१ पूर्वी संकलीत करून ओबीसी प्रवर्गाला जानेवारी २०२२ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री व भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नागपुरातील प्रेसक्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले की, ३ मार्च रोजी मागास वर्गीय आयोगाची स्थापना होऊन अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या नंतर १५ जूनला आयोगावर नऊ सदस्यांची नेमणूकही करण्यात आली. आयोग वस्तुनिष्ठ माहिती संकलीत करण्यासाठी तयार आहे. मात्र, यासाठी आयोगाला कर्मचारी वर्ग तसेच ४३५ रूपयांची गरज आहे. आयोगाने तशी मागणीही केली आहे. हे लक्षात घेता आयोगाला तत्काळ कर्मचारी व ४३५ कोटी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com