परमबीर सिंह यांच्याविरोधात कोपरी आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांना आज लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त जय जित सिंग यांनी दिली आहे. अटकेत असलेल्या आरोपींविरोधातील मोक्का अंतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी त्यांनी आरोपींकडून खंडणी घेतल्याच्या तक्रारी कोपरी आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यावेळी परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलिस आयुक्त पदावर रुजू होते.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com