बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे ती सतत ट्रोलदेखील होतं असते. मात्र यावेळी मलायका एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. मलायकाने आपली एक इच्छा जाहीर केली आहे. मलायकाची ही इच्छा ऐकून सर्वांनाचं तिचं कौतुकही वाटत आहे.
‘तिला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. याबद्दल तिने आपला मुलगा अरहानलादेखील सांगितलं आहे. मलायकाने म्हटलं आहे. मी माझ्या मुलावर सर्वात जास्त प्रेम करते. हे नातं जगातील खुपचं सुंदर नातं आहे. मात्र मला सुरुवातीपासूनचं एका मुलीची आई व्हायचं होतं. कारण मी ज्या कुटुंबातून आहे. तिथे सर्वात जास्त मुलीचं आहेत. त्यामुळे मला मुलींबद्दल खूपच ओढ आहे. मी एका मुलीला दत्तक घेऊन तिला एक सुंदर आयुष्य देऊ इच्छिते’.
सध्या याबद्दल काहीही नियोजन झालेलं नाहीय. मात्र माझी ही इच्छा आहे. पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मलायकाने म्हटलं आहे. ‘माझ्या अनेक मित्रांनी मुले दत्तक घेतली आहेत. त्यामुळे मलाही ही इच्छा आहे. मी याबद्दल माझ्या मुलाशीदेखील बोलले आहे. माझा मुलगा माझ्या प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य करतो. आमच्या घटस्फोटामुळे तो अस्वस्थ झाला होता.
मात्र वेळेनुसार त्याला सर्व गोष्टींचा उलघडा होतं गेला. त्यालाही कळालं की आम्ही एकत्र राहून आनंदी नाही. त्यामुळे आमचं विभक्त होणंचं योग्य होतं.
The post मलायकाच्या आयुष्यात लवकरच होणार न्यू मेंबरची एन्ट्री! appeared first on Lokshahi News.
Credits and Copyrights – lokshahinews.com