ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार सायंकाळी सातपर्यंत ११ हजार १८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी ७ लाख ४६ हजार ४९६ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६२ लाख ३२ हजार २७८ नागरिकांना तर ४५ लाख १४ हजार २१८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे १५८ सत्र आयोजित करण्यात आले.
स्रोत – ठाणे वैभव
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.