अमेरिकेच्या टेस्ला (Tesla) कंपनीकडून भारतामध्ये इलेक्ट्रिक (Electric) वाहन निर्मितीचा (vehicle manufacturing) प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे टेस्लाने भारतामध्ये प्रकल्प (project) सुरू केल्यास कंपनीला विशेष सूट मिळण्याचीदेखील शक्यता आहे. केंद्रामधील अवजड उद्योग मंत्रालयाने तसे संकेत दिले आहेत. टेस्लाने सर्वात प्रथम भारतात प्रकल्प उभारून वाहन निर्मितीला सुरुवात करावी. त्यानंतर टेस्ला कंपनीला सूट देण्याबाबत विचार केला जाणार आहे, असे अवजड उद्योग मंत्रालयामार्फत सांगण्यात आले. सरकारी सूत्रांच्या माहितीप्रमाणे, केंद्र सरकारमार्फत सध्या कोणत्याही वाहन कंपनीला सूट अथवा तत्सम लाभ दिला जात नाही. त्यामुळे टेस्ला कंपनीकरिता आयात (import) शुल्कामध्ये कपात केल्यास देशामध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्या इतर कंपन्यांपर्यंत अयोग्य संदेश जाईल.
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्याचे संकेत
टेस्ला (Tesla) कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी काही दिवसांआधी करण्यात आली होती. परदेशातून आयात होणाऱ्या वाहनांवर सध्या त्यांच्या इंजिनाचा आकार व इतर निकषांच्या आधारे साठ ते शंभर टक्के आयात शुल्क आकारले जाते, परंतु टेस्ला कंपनीने हे शुल्क चाळीस टक्क्यांवर आणण्याची मागणी केली होती. तसेच सामाजिक कल्याण अधिभारदेखील दहा टक्के एवढाच असावा, असे टेस्लाचे (Tesla) म्हणणे आहे. पुढील काळामध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भारतामध्ये टेस्लाचा (Tesla) प्रकल्प स्थापन करण्याकरिता हीच योग्य वेळ असल्याचीही चर्चा आहे.
टेस्लाचे आगमन कधी होणार?
टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कारबरोबरच सोलर रूफ व पॅनल्सचीदेखील निर्मिती करू शकते, परंतु टेस्ला कंपनी ही जगभरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांकरिता प्रसिद्ध आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये टेस्लाचे आगमन कधी होणार, याकडे आता सर्वांची नजर लागली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये टेस्लामार्फत भारतात ३ कार दाखल केल्या जाऊ शकतात. या गाड्यांची किंमत अमेरिकन बाजारपेठेमध्ये साधारण तीस लाख रुपये इतकी आहे, परंतु भारतामध्ये लागणाऱ्या आयात शुल्कामुळे या गाड्यांची किंमत सत्तर लाखांच्या घरात जाईल. त्यामुळे टेस्लामार्फत आयात शुल्कात कपात करण्याची मागणी केली जात आहे. सध्याच्या घडीला भारतामध्ये जॅग्वार, टाटा, हुंदाई, एमजी, महिंद्रा, मर्सिडीज, ऑडी या कंपन्यांमार्फत इलेक्ट्रिक कारची विक्री केली जाते.
दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय
जगभरातील सुप्रसिद्ध फोर्ड ही वाहन उत्पादक कंपनी भारतातील आपला व्यवसाय बंद करणार आहे. गेल्या अनेक काळापासून भारतीय बाजारपेठेत फोर्ड (FORD) कंपनीच्या वाहनांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे फोर्ड कंपनीने भारतातील आपले दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता फोर्ड कंपनीच्या भारतातील कर्मचारी व ग्राहकांचे काय होणार? हा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला आहे. चेन्नई व गुजरातच्या साणंद येथे फोर्ड कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. हे प्रकल्प बंद पडल्यामुळे येथील तब्बल चार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. कंपनीमार्फत कमीत कमी कर्मचाऱ्यांना फटका बसेल, याकरिता प्रयत्न चालू असल्याचे फोर्डमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे, तर दुसरीकडे फोर्ड कंपनीची वाहने असलेल्या ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याचीदेखील काळजी घेतली जाणार आहे. त्याकरिता फोर्ड कंपनी आपल्या डिलर्सच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरवत राहील. फोर्ड कंपनीकडून गाड्यांच्या इंजिन निर्यातीकरिता युनिट चालू ठेवले जाऊ शकते. तसेच कंपनीची सप्लाय चेन सुरळीत राहावी, याकरिता फोर्ड कंपनीचे लहानसे नेटवर्क कार्यरत राहील.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.