हिंदी चित्रपटसृष्टीतला आघाडीचा अभिनेता रणदीप हुड्डा त्याच्या चित्रपटामुळे कायम चर्चेत असतो.मात्र तो सध्या वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.गीतकार प्रियांका शर्माच्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे.
प्रियांका शर्माने रणदीपवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.रणदीपवर हरयाणामधील गीतकार आणि पटकथाकार प्रियांका शर्माने फसवणुकीचा आरोप केला आहे. काही प्रोजेक्टसाठी रणदीपने होकार दिला होता. मात्र ते काम अद्याप करण्यात आले नाही असा आरोप प्रियांकाने केला आहे. त्यासोबतच इतर काही आरोप देखील प्रियांकाने केले आहेत. प्रियांकाच्या वकिलाकडून रणदीपबरोबरच त्याच्या सहकाऱ्यांना देखील कोर्टाद्वारे नोटीस पाठवली आहे.
गीतकार आणि पटकथाकार प्रियांकाने केलेल्या नोटीसमध्ये रणदीप हुड्डाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला होता. त्याने तिला आश्वासन दिले होते की तो लवकरच तिच्या स्क्रिप्टवर काम सुरू करेल. तिने असा ही दावा केला आहे की १ हजार २०० गाणी आणि ४० स्टोरीची स्क्रिप्ट ईमेल आणि व्हॉट्सअॅपद्वारा पाठवल्या होत्या.वर्षे उलटून गेलं तरी रणदिपने अद्याप काम सुरु केल नाही.जेव्हा तिने त्या स्क्रिप्ट परत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला जीवे मारायची धमकी देण्यात आली. प्रियांकाच्या वकिलांनी या सगळ्या छळा विरोधात १० कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.असे गंभीर आरोप रणदीपवर केले आहेत.
Credits and Copyrights – lokshahinews.com