हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्ठीत आपल्या अभिनयाने चाहत्यांच मन जिंकणारा अभिनेता रितेश देशमुख आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज् झालाय.नुकतंचं रितेशने आपल्या नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रदर्शित केलाय.
‘प्लॅन ए प्लॅन बी’ असं या चित्रपटाचं नाव असून हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असणार आहे. ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई’ ‘डर्टी पिक्चर’ किक’ आणि ‘गब्बर इज बॅक’ यासारखे चित्रपटांचं लेखन करणारे रजत अरोरा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.रितेश आणि तमन्ना भाटिया व्यतिरिक्त अभिनेत्री पूनम ढिल्लन आणि कुशा कपिला देखील या चित्रपटात झळकणार आहेत.
“नेटफ्लिक्ससह प्लॅन ए प्लॅन बी ची घोषणा करताना मी खूप उत्साहित आहे. ही एक अनोखी कथा आहे. यात असमान्य पात्र एकमेकांच्या विरोधात असतील. सोबतच प्रेमाला नव्या रूपात सादर करणार आहेत. नेटफ्लिक्सवर जगभरातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बनवण्याचा मला पूर्णपणे आनंदझाला आहे आणि मला खात्री आहे की लोकांना ते आवडेल”.असं दिग्दर्शक शशांक घोष म्हणाले
Credits and Copyrights – lokshahinews.com