तालिबानने आता मात्र अफगाणिस्तानचा पूर्णपणे ताबा घेतला असून, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन केले आहे. अफगाणिस्तानातील धक्कादायक व्हिडीओ व फोटोज् पाहून जगभरामधून प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे. तब्बल वीस वर्षांनंतर तालिबानने अफगाणिस्तान देश ताब्यात घेतला. हजारो लोक अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याची हृदयद्रावक दृश्ये सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अलीकडेच बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यानेदेखील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याने अफगाणिस्तानकरिता एक खेदजनक पोस्ट शेअर केली आहे, परंतु त्याच्या या पोस्टवरून सोशल मीडियावर सध्या तो खूपच ट्रोल होत आहे.
अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर केली हळहळ व्यक्त
अफगाणिस्तानात आता तालिबानचे राज्य आले असून, संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे, तर तेथील नागरिक अक्षरशः सैरावैरा पळताना दिसत आहेत. बर्याच नागरिकांनी आपले प्राणसुद्धा गमावले आहे. त्यावर आता जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, तर बॉलिवूडनेही आता आपले मौन सोडले आहे. बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यानेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर हळहळ व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवरील त्याचा एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर करत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या फोटोमुळेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
माणुसकी जिवंत आहे का?
सिद्धार्थ शुक्लाने शेअर केलेल्या या ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोमध्ये तो डोक्याला हात लावून बसलेला दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर फार दुःख व नैराश्याचे भाव दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे की, “अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहून प्रचंड हताश झालो आहे. माणुसकी जिवंत आहे का?” सिद्धार्थ शुक्लाच्या या पोस्टवरूनच काही युझर्स त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया शेअर करत त्याला पाठिंबा देत आहेत, परंतु काही युझर्सनी तर थेट त्याला टार्गेट करण्यास सुरुवातच केली आहे.
सिद्धार्थ शुक्लाला फॅन्सचा पाठिंबा
सिद्धार्थ शुक्लाच्या या पोस्टवर नेटिझन्सकडून टीकांचा भडीमार चालू झाला आहे. “इथेही नाटक सुरु आहे का?” असा प्रश्न करत काही युझर्सनी त्याला ट्रोल केले. खरं तर सिद्धार्थ शुक्लाच्या या फोटोशूटबरोबर शेअर केलेली पोस्ट नेटकऱ्यांना खटकली आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थ शुक्ला ट्रोलर्सचा निशाणा होत असल्याचे पाहून त्याचे फॅन्सदेखील आता त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. “काही कलाकार तर अशा मुद्द्यावर बोलतसुद्धा नाहीत, परंतु तू नेहमीच सत्याच्या बाजूने असतोस”, अशा कमेंट्स करत त्याचे फॅन्स त्याचा बचाव करताना दिसून येत आहेत.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.