मुंबई : गर्दी वाढली आहे. ख्रिसमस, आणि नवीन वर्ष असतांना लोक काळजी अधिक घेत नाहीत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. यावर प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यक आहे. लसीकरण झाल्यावरही मास्क लावावे लागणार आहे. शाळा आणि महाविद्यालय या संदर्भातील निर्णय पुढील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री नाही तर सर्वांनी काळजी घ्यावी लागेल, असं म्हणत कोविड परिस्थिती पाहून मुख्यमंत्री विधानभवनात यायचं की नाही हा निर्णय घेतील, असेही ठाकरे म्हणाले. प्रत्येकाच्या मनात कोविड होऊन गेला, लस घेतली त्यामुळे होणार नाही असा गैरसमज आहे, असे असले तरी दोन लस घेऊन मास्क घालवाच लागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.