सध्या इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी संकटामुळे सामान्य माणूस वैतागला आहे. ऑक्टोबर महिन्यात या संकटात आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. कारण ऑक्टोबर महिन्यापासून घरगुती सिलिंडरच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीसह मुंबईमध्ये (CNG)व पाईप गॅसचे (PNG) दर दहा ते अकरा टक्क्यांनी वाढू शकते. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालाप्रमाणे, ऑक्टोबर महिन्यामध्ये गॅसच्या दरात जवळपास ७६% ची वाढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्यांचे किचन बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. देशांतर्गत गॅस धोरणाप्रमाणे दर ६ महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेर आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे आता १ ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित केले जाणार आहेत.
सीएनजी व पीएनजी आणखी महागण्याची शक्यता
अॅडमिनिस्टर्ड रेट (Administered) म्हणजे APM चा दर सध्या ७.७९ डॉलर्स एवढा आहे. १ ऑक्टोबरपासून APM चा दर ३.१५ डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट इतका होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी ६ व बीपी पीएलसी खोल समुद्रामधील वायू क्षेत्रामधून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ऑक्टोबरपासून ७.४ एएमबीटीयू एवढी होणार आहे. त्यामुळे पुढील काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किमती दहा ते अकरा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, तर या दरवाढीमुळे एप्रिल २०२२ पर्यंत सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) आणखी महागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील गॅसचे दर वाढल्यास ओएनजीसी (ONGC ) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (Reliance Industries Limited) मोठा फायदा होऊ शकतो.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ
गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत खूप वाढ झाली होती. त्यामुळे पेट्रोलचे दर शंभरीपार गेले होते, तर डिझेलदेखील शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलिटर दर १०७.२६ रुपये, तर एक लिटर डिझेलकरिता ९६.१९ रुपये मोजावे लागत आहेत. तसेच दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोल व डिझेलचा दर अनुक्रमे १०१.१९ व ८८.६२ रुपये एवढा आहे.
The post पेट्रोल, डिझेलनंतर आता CNG खिसा कापणार ; जाणून घ्या किती पैसे वाढणार appeared first on माय मराठी – Maay Marathi News.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.