अंबरनाथ : ठाणे शहरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची बोटं तोडल्याची घटना ताजी असतानाच आता अंबरनाथमध्येसुद्धा मुजोर फेरीवाल्यांनी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.
अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागात फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात बस्तान मांडलं आहे. गर्दीच्या वेळी तर फेरीवाल्यांच्या उच्छादामुळे प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना चालायलाही जागा उरत नाही. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्व भागात स्टेशन परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली.
यावेळी फेरीवाल्यांना त्यांच्या पाट्या आणि अन्य सामान उचलण्यास हे कर्मचारी सांगत होते. मात्र याचदरम्यान काही मुजोर फेरीवाले त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण केली. अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारी आनंद भिवाल, उमेश जहागिरदार, लक्ष्मण फर्डे आणि चालक नरेश पोटाळे या चौघांना यावेळी धक्काबुक्की, शिवीगाळ करण्यात आली.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.