डोंबिवली – डोंबिवलीतील कोपर पुलाचे सर्व काम पूर्ण झाले असून येत्या मंगळवारी 7 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी 1 वाजता ऑनलाईन कॉपर पुलाचे उदघाटन संपन्न होणार असल्याची माहिती डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी दिली.कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नामुळे कोपर पुलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. कोपर उड्डाण पुल धोकादायक झाल्यामुळे 15 सप्टेंबर 2019 पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. सदर पुल बंद असल्याने नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी कोव्हीड – 19 च्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीच्या काळात रेल्वे सेवा बंद असताना उड्डाण पुल पुर्नबांधणीचे काम महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशाने तातडीने हाती घेण्यात आले.त्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा पाठपुरावा होता. अत्यंत कमी वेळात कोपर पुलाचे सर्व गर्डर बसविण्यात आले. त्यानंतर पुलाच्या संरक्षक भिंतीचे व स्लॅब भरण्याचे काम रखडले. अखेर दोन दिवस झाले पावसाने थोडी उसंत आणि महापालिका व रेल्वे अधिकारी यांनी स्लॅब भरणे,क्यूरिंग, डांबरीकरण आणि रंगरंगोटी असा सुमारे 12 .4 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण काम पूर्ण केले.त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या डोंबिवलीकरांना गणेश चतुर्थीपासून नव्या कोपर पुलावरून जाता येणार आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.यापूर्वी जोशी हायस्कूल उड्डाणपूलमुळे डोंबिवली पश्चिम लोकांना कोविड काळात त्याचा खूप उपयोग झाला. कोपर पुलामुळे आता वाहतूक कोंडी होणार नाही. मुख्य म्हणजे आता दोन्ही उड्डाणपूलामुळे वाहतूक कोंडी होणार नाही.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This Post has been retrieved from the RSS feed. contact for further details of Discussion. We do not own or take copyrights of this post.