स्रोत: रत्नागिरी खबरदार
मुंबई : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत 10 रूग्णांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या आगीच्या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
फायर ॲाडिट केले आहे का? असा सवाल करत यावर श्वेतपत्रिका जारी करा, असे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी आरोग्य मंत्र्यांच्या कामाचेच ॲाडिट करून हकालपट्टी करा, अशा शब्दांत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, “भंडारा, विरार, कोल्हापूरच्या घटनेनंतरही सरकारला जाग आली नाही. आज नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या आगीत 10 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. फायर ॲाडिट केलंय का? यावर श्वेतपत्रिका जारी करा. राज्यात रूग्णालये मृत्यूचे सापळे बनताहेत. आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा”, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.