पुणे : अजित पवार यांचा परखडपणा सगळीकडे चालणार नाही, एसटीचे विलिनीकरण का होणार नाही ते त्यांनी सांगाव अस वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
एसटीचं विलिनीकरण होईल असं डोक्यातून काढून टाका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात ठणकावलं होत. कोणत्याही सरकारच्या काळात एसटीचं विलिनीकरण शक्य नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
राज्य सरकार हे गेंड्यांच्या कातडिशीवाय भयानक झाले आहे, असे म्हणत जोरदार निशाणा पाटील यांनी लगावला. म्हाडा, आरोग्य टीईटी परीक्षेत मोठा भष्ट्राचार झाला आहे. यामध्ये सगळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत. या प्रकरणामध्ये अनेक मंत्री अडकण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला. सीबीआय चौकशीनंतर सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले.