बहुचर्चित ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. तर हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊननंतर अक्षयचा हा पहिला चित्रपट असेल, जो चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार आहे.
रणजीत तिवारीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. अक्षय कुमारचा हा चित्रपट गेल्यावर्षीपासून बराच चर्चेत होताय. कारण कोरोना काळात शूटिंग पूर्ण होणाऱ्या चित्रपटांमध्ये याचा समावेश होतो. त्यामुळे सगळ्या बाबींचा विचार करून आणि सर्व खबरदारी घेऊन शुटिंग पूर्ण करण्यात आली.
अक्षय व्यतिरिक्त हुमा कुरेशी, वाणी कपूर, लारा दत्ता या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाची निर्मिती वासू भगाणी, जकी भगानी,दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवानी आणि निखील अडवानी यांनी केली आहे. बेल बॉटम ची कथा एका वास्ताविक घटनेवर आधारित असून प्रेक्षकांना चित्रपटात ८० व्या दशकाची झलक पाहायला मिळेल.
‘बेल बॉटम’ शिवाय ‘सूर्यवंशी’ ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतू’, आणि ‘बच्चन पांडे’, यांच्यासह अक्षय आणखी बऱ्याच चित्रपटामध्ये दिसणार आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com