मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे आज ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ठाण्याला रवाना झाले आहेत. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यामध्ये कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत. त्यांची दोन बोटं फेरीवाल्याने तोडली आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करत असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला होता. सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला होता. “ठाण्यामध्ये परप्रांतीय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांमार्फत ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल व याची मस्ती उतरवली जाईल. फेरीवाल्याची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून यांना फिरतादेखील येणार नाही, त्यावेळी कळेल. यांची हिंमत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत,” असेही राज ठाकरे म्हणाले.
ठाणे महापालिका हद्दीत नेमके काय घडले?
ठाणे महापालिकेतील माजिवडा, मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याकरिता महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) गेल्या होत्या. या कारवाईच्या काळात ३० ऑगस्ट रोजी अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. त्यावेळी बचावाकरिता त्यांनी हात वर केल्यामुळे त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावाकरिता धावलेल्या अंगरक्षकाचेदेखील एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांकरिता दाखल करण्यात आले आहे, तर आरोपी अमरजित यादव हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही
ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये एखाद्या फेरीवाल्याकडून थेट महिला अधिकाऱ्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमध्ये सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक दोघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावरील उपचारांची सर्व जबाबदारी ठाणे महानगरपालिकेने घेतली असून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी त्वरित अटक केली. ही घटना अतिशय निंदनीय असून, या प्रकरणामधील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची कृती अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.