स्रोत: रत्नागिरी खबरदार
मुंबई : राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली आहे. दरम्यान, फडणवीस यांनी मलिकांच्या जावयाच्या घरात अंमली पदार्थ सापडल्याच्या केलेल्या दावा केला होता. त्याविरोधात नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी फडणवीस यांना जाहीर नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या काही फोटोंवर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रुनुकसानीची नोटिस पाठवली आहे. तसेच या प्रकरणी जाहीर माफी मागून ४८ तासांत हे ट्विट डिलिट करा, अन्यथा अब्रुनुकसानीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा असा इशारा दिला आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या की, नवाब मलिक यांनी काही फोटो शेअर करून आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. त्याविरोधात मी आता आपीसीच्या विविध कलमांखाली तक्रारीसह अब्रुनुकसानीची नोटिस पाठवण्यात येत आहे. नवाब मलिक यांनी एकतर बिनशर्त जाहीर माफी मागावी व ते ट्विट ४८ तासांत डिलिट करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.