मुंबई : बैलगाडी शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. ट्वीटरद्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचा अतिशय पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडी शर्यतीवर मा. सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली, याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. 2014 साली न्यायालयाने ही बंदी टाकली.
आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्त्वात एक शिष्टमंडळ सुद्धा केंद्र सरकारकडे घेऊन गेलो.तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरजी यांनी एक गॅझेट काढले आणि ही शर्यत पुन्हा सुरू झाली.
परंतू न्यायालयाने त्यावर पुन्हा बंदी आणली. अखेर 2017 मध्ये आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली. ‘रनिंग अॅबिलिटी ऑफ बुल’ असा शास्त्रीय अहवाल दोन महिन्यात तयार केला. आजचा निर्णय हा त्या अहवालाला स्वीकृत केल्यानंतर आला आहे. मला या निर्णयाचा अतिशय आनंद आहे. “
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.