मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले असून राज्यावर मोठी आपत्ती आली. या आपत्तीजन्य परिस्थितीत बॉलिवूडचे ‘खान’ कुठं गायब झालेत? असा संतप्त सवाल मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये दिपाली सय्यद आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला .
सय्यद म्हणाल्या, मराठी चित्रपटांपेक्षा आपण हिंदी चित्रपटांना झुकतं माप देतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा ते मदतीला येतात का?, कुठे आहेत सलमान आणि शाहरूख?, असा सवाल त्यांनी केला.
मराठी चित्रपटांना पाठबळाची गरज
आपण जर मराठी चित्रपटसृष्टीला ताकद दिली तरच मराठी कलाकार पुढे येतील. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही. त्यांनी मदत करण्यासाठी बाहेर पडावं अशी अपेक्षा असेल तर लोकांनीही त्यांना पाठबळ द्यायला हवं, अस सय्यद म्हणाल्या.माझं माहेर चिपळूण तालुक्यातील पोफळी शिरगाव येथे आहे. त्यामुळे चिपळूणला माझं घर म्हणून आवश्यक असलेली सर्व मदत मी करेन, असेही त्यांनी सांगितले.
पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत जाहीर
दिपाली सय्यद यांनी याआधी पुरग्रस्तांसाठी 10 कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती.
Credits and Copyrights – lokshahinews.com