महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज, मंगळवारी चांदीवाल आयोगासमोर हजेरी लावली. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास चांदीवाल आयोग करत आहे. या प्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी अनिल देशमुख यांना आयोगानं समन्स बजावला होता.
अनिल देशमुख सकाळी साडेअकराच्या सुमारास आयोगासमोर हजर राहिले. सोमवारी परमबीर सिंह आणि सचिन वाझे चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. यावेळी हे दोघं समोरासमोर आले आणि या दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
अनिल देशमुखांच्या वकिलांनीही या भेटीवर आक्षेप नोंदवलाय. वसूलीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. अनिल देशमुख यांना न्यायालयीन चौकशी सुनावली आहे. ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर राज्य सरकारने या चौकशीसाठी निवृत्त चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. यामार्फत अनिल देशमुख, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांची चौकशी सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकं आढळली होती. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झालेच, पण या प्रकरणानं वेगळं वळणंही घेतलं. याचप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. तर 100 कोटींच्या वसुलींच्या आरोपानंतर परमबीर सिंह आणि अनिल देशमुख चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांनाही ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.