अलिकडच्या काळामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल अधिक वाढला आहे. गुंतवणूक करण्याकरिता बरेच जण नवीन कंपन्या शोधत असतात. अशा गुंतवणूकदारांकरिता एक उत्तम पर्याय समोर येत आहे. आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ लवकरात लवकरच शेअर बाजारामध्ये धडकण्याची शक्यता आहे. सिक्युरिटी व एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसीच्या आयपीओला मंजुरी दिली आहे.
सन लाईफच्या १२.५% शेअर्सची विक्री
आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसीचा आयपीओ पंचवीस हजार कोटी रुपयांचा असू शकतो. हा आयपीओ संपूर्ण ऑफर फॉर सेल असणार आहे. याअंतर्गत आदित्य बिर्ला सन लाईफच्या १३.५ % शेअर्सची विक्री केली जाणार आहे. त्यासोबतच या ऑफरमध्ये कंपनी आपल्या कॅनेडियन जॉईंटव्हेंचर पार्टनर कंपनी सन लाईफच्या १२.५% शेअर्सची विक्री करणार आहे.
एएमसी कंपनीमध्ये आदित्य बिर्ला यांची ५१ % भागीदारी
आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी कंपनीमध्ये आदित्य बिर्ला यांची ५१ % भागीदारी आहे. तर कॅनेडियन कंपनी सन लाईफची ४९% भागीदारी आहे. सध्या HDFC AMC, UTI AMC, निप्पॉन लाइफ इंडिया एएमसी या कंपन्या शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहेत. त्यानंतर आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी ही शेअर बाजारामधील ४थी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असणार आहे.
२०२१ मध्ये आयपीओकरिता अर्ज केला होता
आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी कंपनीने १९ एप्रिल २०२१ मध्ये आयपीओकरिता अर्ज केला होता. त्यासाठी आता सेबीने मंजुरी दिली आहे. त्यानंतर या कंपनीचे २८ लाख ५० हजार ८८० शेअर्स बाजारामध्ये विक्रीकरिता येणार आहेत. यांची किंमत प्रत्येकी पाच रुपये असणार आहे. याव्यतिरिक्त सन लाईफ एएमसीने ३ कोटी ६० लाख २९ हजार शेअर्स बाजारामध्ये विक्रीकरिता काढले आहेत.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com