पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्यासाठी सतरा नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे दिली. विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्क भरल्याची पावती दोन प्रतीत, मूळ कागदपत्रे १७ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत निवडलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायची आहेत. विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्काची पावती, मूळ कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे १८ ऑक्टोबरला जमा करायची आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.