पुणे : मागील दोन-तीन दिवसांपासून पुणे, मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यात तुफान पाऊस बरसतोय. काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पुरातत्व खात्याकडून पुणे जिल्ह्यातील कार्ला लेणी आणि परिसर पाऊस थांबत नाही तोपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्ला येथील एकविरा देवी गडावर काल दरड कोसल्याची घटना घडली होती.
त्यामुळे आज मावळ तहसीलदारांनी ज्या ठिकाणी दरड कोसळी तिथली पहाणी केली. त्यानंतर प्रशासनाकडून पर्यटकांनी कार्ला लेणी आणि परिसरात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.