Arogya Exam Dates : आरोग्य विभागाच्या 6205 पदांच्या भरतीसाठी होणाऱया परीक्षेत ‘न्यासा’ कंपनीने घातलेल्या घोळामुळे पुढे ढकलण्यात आलेली आरोग्य विभागाची परीक्षा लवकरच पार पडणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 15, 16 ऑक्टोबर किंवा 22, 23 ऑक्टोबर रोजी या परीक्षा पार पडतील यासंदर्भात आरोग्य विभाग आणि ‘न्यासा’ कंपनी यांची बैठक उद्या सोमवारी होत आहे. त्यात तारीख निश्चित केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्य विभागाची 25 व 26 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
उमेदवारांचे हॉलतिकीट, परीक्षा केंद्राच्या गोंधळामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज माहिती दिली. आरोग्य विभागाची परीक्षा 15, 16 ऑक्टोबर रोजी होईल. मात्र त्या दिवशी रेल्वेचीही परीक्षा असून ती परीक्षा पुढे ढकलल्यास या दिवशी आरोग्य विभागाची परीक्षा होईल. मात्र तसे न झाल्यास 22 व 23 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची परीक्षा पार पाडली जाईल, असे टोपे म्हणाले. शाळादेखील 4 ऑक्टोबरपासून सुरू होत असून शाळांची व शालेय व्यवस्थापनाची उपलब्धता आव्हानात्मक विषय आहे. त्यामुळे परीक्षेसाठी शनिवार व रविवार निवडला जात असल्याचे ते पुढे म्हणाले. (Arogya Exam Dates)
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.