मुंबई: आर्यन खान प्रकरणानंतर वादग्रस्त ठरलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना या प्रकरणातून हटवण्यात आलं आहे. वानखेडे यांची मुंबई एनसीबीतून दिल्ली एनसीबीत बदली करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. वानखेडे यांची बदली हा वानखेडेंसाठी मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे.
क्रुझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती. मुंबई एनसीबीकडून शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी केल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याचाच परिणाम म्हणून वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. दिल्ली झोनमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.