मुंबई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलासा दिला आहे. (Bail To Aryan Khan) आर्यन खान प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यासोबत मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. निकालाची प्रत उद्या येणार असल्याने आजची रात्र आर्यन खानला तुरुंगातच काढावी लागणार आहे. आर्यन खान उद्या तुरुंगाच्या बाहेर येणार आहे.

गेल्या 25 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यन खानच्या जामीनासाठी शाहरुख खानने खूप प्रयत्न केले असून त्यासाठी आतापर्यंत तीन वकील बदलले आहेत.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया या आलिशान क्रुझवर एनसीबीने 2 ऑक्टोबरला धाड टाकली होती. यावेळी ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा आणि अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. (Bail To Aryan Khan) आर्यनसह अरबाज आणि मूनमून धमेचाच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली

स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.