मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ओमिक्राॅनचे रुग्णही वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विधानभवनात येणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यात पाडवी यांच्यासह 52 जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत.
दुसरीकडे, राज्यात ओमिक्रॉन रुग्णवाढीचा वेग वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात एकूण 31 नवे ओमिक्रॉन बाधित रुग्ण काल आढळले. या 31 रुग्णांपैकी 27 रुग्ण फक्त मुंबईत आढळून आले आहेत. पुणे ग्रामीण व अकोला ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
दरम्यान, पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोथरुड येथील एमआयटीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महाविद्यालयात दोन्ही डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असूनही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.