मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत.असाच एक वेगळा विषय वृत्ती या सिनेमात हाताळला जात आहे.विधवा बाईला समाजात कमी लेखले जाते.या संवेदनशील विषयाला हात घालत वृत्ती हा सिनेमा प्रस्तुत केला जात आहे.

इंटरनशनल फिल्म फेस्टिवल ऑफ साउथ एशियामध्ये आज या चित्रपटचा वर्ल्ड प्रीमिअर पार पडणार आहे.वृत्ती या चित्रपटाचे दिग्दर्शन एस.आश्विन यांनी केले आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण उसरणी येथे पार पडले आहे.
मीरा जोशी आणि अनुराग वरळीकर वृत्ती या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Credits and Copyrights – lokshahinews.com