कल्याण/संघर्ष गांगुर्डे – ठाणे जिल्ह्यात सामाजिक राजकीय उल्लेखनीय काम करून ठाणे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या कामाची दखल घेतली जाते सोबत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पायाला भिंगरी बांधून तळमळीने मेहनतीने वंचित बहुजन आघाडी कशी मजबूत होईल त्याच बरोबर तळागळातील वंचित घटकाला कसा न्याय भेटेल अश्या उद्देशाने मायाताई निस्वार्थ काम करत आहे. सामाजिक बाधिलकी जपत कोणत्याही सामाजिक कामासाठी नेहमी तत्पर असतात.यामुळेच मायाताई कांबळे यांच्या कामाची दखल घेऊन साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे आधार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साहित्यसम्राट,लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त मायाताई कांबळे यांना समाजभूषण पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला. त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला यासाठी त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महिला मिनी मॅरेथॉन स्पर्धा २०२३ मध्ये ५५० हून अधिक महिलांचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिका...