भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्यपुर्व फेरीत बलाढ्य अशा ऑस्ट्रेलिया संघाचा 1-0 असा पराभव करत सेमी फायनल्समध्ये प्रवेश मिळवला.जगभरातून भारतीय महिला हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव होतोय,सिनेसृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन महिला हॉकी संघाचं कौतुक केलं आहे. तसेच आयुष्मान खुरानाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टेटस टाकत भारतीय आयुष्मान खुरानाने शाब्बासकी दिली आहे.
“भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला. भारतीय महिला हॉकी खेळात उपांत्य फेरीत पोहचला आहे”. अशी पोस्ट करत आयुष्मानने महिला हॉकी संघाचं मनोधैर्य वाढवलं आहे. टोक्यो 2020, STRONGER टुगेदर, युनायटेड बाय इमोशन्स, असे हॅशटॅग वापरत त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टेटस टाकलं आहे.
या रोमांचक अशा सामन्यात वंदना कटारियाने तीन गोल मारत इतिहास रचला.ऑल्मिपिक मध्ये हॅट्रिक करणारी ती पहिली महिला हॉकी खेळाडू ठरली.
Credits and Copyrights – lokshahinews.com