प्लॅनेट मराठी सतत नवनवीन कंटेट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.आजपर्यंत वडील-मुलाच्या नात्यावर अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या समोर आल्या.वडील मुलाचे नाते हे खुप संवेदनशील असते. याच संवेदनशील नात्याला घेऊन एक वेबसिरीज येत आहे. ‘बाप बीप बाप’ वेब सीरिज ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला प्लॅनेट मराठीवर येत आहे.
अमित कान्हेरे दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, पर्ण पेठे, तेजस बर्वे, उदय नेने झळकणार आहेत.नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून वडील – मुलाचे अवघड नाते यात अधोरेखित करण्यात आले आहे.या वेब सीरिजचे लेखन प्रतिक उमेश व्यास आणि अमित कान्हेरे यांनी केले असून संवाद योगेश जोशींनी लिहिले आहेत तर छायाचित्रण विशाल सांघवाई यांनी केले आहे.
अभिनेते शरद पोंक्षे बर्याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.या वेबसिरीज मध्ये बापाच्या भुमिकेत दिसणार आहेत.
Credits and Copyrights – lokshahinews.com