बँकेमध्ये नोकरीची इच्छा असणाऱ्यांकरिता खूशखबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदावर महाभरतीची घोषणा करण्यात आली आहे. याकरिता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच १ सप्टेंबर २०२१ पासून सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्रच्या bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमार्फत लागू करण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशनप्रमाणे बँकेच्या स्पेशालिस्ट ऑफिसर पदाकरिता एकूण १९० जागांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची १९ सप्टेंबर २०२१ ही अंतिम तारीख आहे. या भरतीकरिता परीक्षेची तारीख अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला जाऊन नोटिफिकेशन नक्की वाचा.
या वेबसाइटला भेट देऊन अर्ज दाखल करू शकता
इच्छुकांनी सर्वात आधी bankofmaharashtra.in या वेबसाइटला भेट द्या. संकेतस्थळाच्या होम पेजवर Recruitment या पर्यायावर click करा. त्यानंतर Career in BOM पर्यायावर click करावे. यामध्ये RECRUITMENT OF SPECIALIST OFFICERS IN SCALE I & II या लिंकवर click करा. त्यानंतर वेबसाइटवर विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरा व रजिस्ट्रेशन करावे. registration नंतर अर्ज दाखल करता येऊ शकतो. थेट लिंकवर जाण्याकरिता येथे click करा.
एकूण १९० जागांवर भरती केली जाणार
बँक ऑफ महाराष्ट्रकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, एकूण एकशे नव्वद जागांवर भरती केली जाणार आहे. यात ॲग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर पदाकरिता शंभर जागा भरल्या जाणार आहेत. याबरोबरच सिक्युरिटी ऑफिसर पदाकरिता १० जागा, कायदे विभागाकरिता १० जागा, पर्सनल ऑफिसर पदाकरिता १०, विंडोज ॲडमिनिस्ट्रेटरकरिता १२ जागांसह इतर पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये खुल्या गटाकरिता ९३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त ईडब्ल्यूएफ प्रवर्गाकरिता १८, ओबीसीकरिता ४६, एससी प्रवर्गाकरिता २४ व एसटी प्रवर्गाकरिता ९ जागा आरक्षित आहेत.
नेटबँकिंगच्या माध्यमातून अर्जाचे शुल्क भरता येणार
बँकेच्या स्पेशालिस्ट ऑफिसर पदाकरिताच्या जागेसाठी ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गामधील उमेदवारांना ११८० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे, तर एससी, एसटी प्रवर्गाकरिता ११८ रुपये शुल्क भरावे लागेल. अर्जाचे शुल्क डेबिट अथवा क्रेडिट कार्डने नेट बँकिंगच्या माध्यमातून भरता येणार आहे.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.