Bank New guidelines : जर तुमच्याकडे तुमच्या बचत बँक अकाऊंटसाठी इंटरनेट बँकिंग सुविधा नसेल, तर ५०,००० रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे धनादेश देणे तुमच्याकरिता त्रासदायक ठरू शकते. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (Positive Pay System) लागू करण्यास सुरुवात केली आहे. बहुतेक बँका १ सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करतील. सगळ्यात विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट २०२० मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टीमसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम जाहीर केली होती. या नियमानुसार, बँका ही सुविधा सर्व खातेधारकांना त्यांच्या इच्छेनुसार पन्नास हजार अथवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या धनादेशाकरिता लागू करू शकते.
Bank New Guidelines : या सेवा नसतील तर निर्माण होऊ शकते समस्या
आरबीआयच्या या नियमाप्रमाणे, धनादेश देण्याआधी तुम्हाला बँकेला याबाबत माहिती द्यावी लागेल अन्यथा धनादेश स्वीकारला जाणार नाही. तुमचा चेक नाकारला जाईल. या नियमामुळे ज्येष्ठ नागरिक जे नेट बँकिंग अथवा मोबाईल बँकिंगच्या सेवा वापरत नाहीत, त्यांच्याकरिता समस्या निर्माण होऊ शकतात.
धनादेशांकरिता Positive Pay System लागू
ॲक्सिस बँकेसह काही बँकांनी पन्नास हजारांपेक्षा अधिक धनादेशांकरिता पीपीएस अनिवार्य केले, ज्या अंतर्गत ग्राहकांना नेट, मोबाईल बँकिंगद्वारे अथवा शाखेला भेट देऊन बँकेला चेक तपशील द्यावा लागेल. स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँकेने ५०,००० रुपयांच्या वरील धनादेशांकरिता पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली. सध्या या बँकांनी ते ग्राहकांकरिता पर्यायी ठेवले आहे. हा नियम लागू करण्याचा हेतू ग्राहकांची सुरक्षा आहे. ही प्रणाली चेक फसवणूक रोखणार आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.