तुम्हाला बँकेशी संबंधित काही काम अथवा बँकेमधून मोठी रक्कम काढायची असेल, तर त्याकरिता काही दिवस ताटकळत राहावे लागणार आहे. कारण आजपासून बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. आता बँका थेट १ सप्टेंबरला उघडणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या सणांमुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. यापैकी आज चौथा शनिवारी व त्यात उद्या रविवार असल्याने बँका बंद असतील. तर गोकुळाष्टमी असल्यामुळे ३० व ३१ तारखेला देशाच्या वेगवेगळ्या भागांत बँका बंद राहतील.
या दिवशी सर्व राज्यांमध्ये बँका बंद नसतील
गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्व राज्यांमध्ये बँका बंद नसतील. तर संबंधित प्रदेशाप्रमाणे, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नियम लागू असतील. रिझर्व्ह बँकेमार्फत स्थानिक सणांनुसार प्रत्येक राज्यामध्ये सार्वजनिक सुट्ट्या निश्चित केल्या जातात. भारतामधील बऱ्याच राज्यांमध्ये कृष्णजन्म अथवा गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे ३० तारखेला चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, चंदीगढ, कानपूर, देहरादून, जम्मू, लखनऊ, पाटणा, रायपूर, शिमला, शिलाँग, श्रीनगर, रांची व गंगटोकमध्ये बँका बंद असतील. तर इतर राज्यांमध्ये ३१ ऑगस्टला बँक हॉलिडे असल्यामुळे बँका बंद असतील.
एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे एटीएम रिकामे होण्याची शक्यता
सलग चार दिवस सुट्ट्या आल्यामुळे बँकेच्या एटीएम मशीनमध्ये पैशांचा खडखडाट जाणवण्याची दाट शक्यता आहे. सध्या कोरोना निर्बंधांमुळे लोक बँकेमध्ये जाणेदेखील आवर्जून टाळत आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेकजण डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत असल्यामुळे बँका बंद असूनदेखील तितकीशी गैरसोय होणार नाही.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.