अभिनेत्री कियारा अडवाणीने हळूहळू इंडस्ट्रीमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आज कियारा अडवाणीचा वाढदिवस आहे.कियारा विशेषतः तिच्या चाहत्यांमध्ये सध्या राहणीमानामुळे ओळखली जाते. कियाराचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून झाले. एवढेच नाही तर अभिनेत्रीने अभिनयाचे बारकावे अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेतून शिकले आहेत. बऱ्याचदा चाहत्यांना असे वाटते की कियाराने आपल्या करिअरची सुरुवात ‘एमएस धोनी’ या चित्रपटातून केली होती. परंतु, अभिनेत्रीने 2014 मध्ये ‘फुगली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
मात्र, या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही आणि कियाराला देखील प्रसिद्धी मिळू शकली नाही. सलमान खानच्या सल्ल्याने कियाराने तिचे नाव बदले होते. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी तिचे नाव आलिया अडवाणी असल्याचे अनेक वेळा अभिनेत्रीने स्वतः सांगितले आहे. कियाराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नाव आलिया असल्याचे अजूनही चाहत्यांच्या लक्षात आले नसेल. कियारा आपले खरे नाव अर्थात आलिया हे नावाच्या मध्यभागी लावते. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर कियारा आलिया अडवाणी असे नाव ठेवले आहे.
कियाराला 2016च्या ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून ओळख मिळाली. यानंतर अभिनेत्री काही चित्रपटांमध्ये दिसली, पण तिला हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर ‘कबीर सिंह’ या चित्रपटाने अभिनेत्रीला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर अभिनेत्री पुन्हा तिच्या कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. लोकशाही कडून कियारा अडवाणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Credits and Copyrights – lokshahinews.com