नांदेड : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकामागून एक घडामोडी घडत आहेत. अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद तसेच पोडनिवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळाल्या.
यातच आता भाजपच्या एका नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात असून, लवकरच सत्ता बदल होईल, असा दावा या भाजप नेत्याने केला आहे. राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी हा दावा केला आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा बबनराव लोणीकर यांनी केला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत घरोबा केला असला, तरी आता या पक्षांमध्ये फूट पडणार असल्याचा दावाही लोणीकर यांनी केला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.