कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या आशेळे गावातील मुख्य रस्त्याची गेल्या पाच वर्षापासून दुरावस्था आहे . याबाबत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होम हवन करत उपरोधिक आंदोलन केले .या आंदोलना दरम्यान आमदार गायकवाड यांनी रस्त्यावर ठाण मांडून राज्य सरकारचा निशेध नोंदवला .यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध नोंदवला .आमदार गायकवाड यांनी या रस्त्याच्या डागडुजीसाठी सातत्याने पाठपुरावा करतोय ,डीपीआर मंजूर देखील झालाय मात्र शिवसेना नेत्याकडून जाणून-बुजून अडवणूक केली जातेय निधी दिला जात नाहीये . केवळ कामाचे श्रेय लाटण्यासाठी शिवसेना नेत्यांकडून हा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप केला . यासाठीच मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून हे काम लवकरात लवकर सुरू कराव अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली
CUET UG 2023 | DU ने CUET UG च्या विद्यार्थ्यांना दिला सल्ला, म्हणाला- कोर्स निवडण्यापूर्वी जरूर विचार करा
Download Our Marathi News App नवी दिल्ली : दिल्ली युनिव्हर्सिटीने...