बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल म्हणून अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण ओळखले जातात. 2018 साली या जोडीने विवाह करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. गेली अनेक वर्षे ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. दरम्यान शनिवारी मुंबईत रणवीर दीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसला. यामुळे चाहत्यांचा कमेंट्स वर्षाव होतोय.
रणवीर स्वतः दीपिकाला मुंबईतील खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. यावेळी काही मीडिया फोटोग्राफर्सनी त्यांना स्पॉट केलं. त्यामुळे दीपिका आनंदाची बातमी देणार असल्याचं अनुमान त्यांच्या चाहत्यांनी लावलं आहे.दीपिका आणि रणवीरच्या विवाहानंतर त्यांचे चाहते या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Credits and Copyrights – lokshahinews.com