मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोप केले होते. कथिर शंभर कोटी रूपयांच्या वसूली प्रकरणी सध्या सीबीआयकडून तपास सुरू आहे. तपासादरम्यान सीबीआयनं पाच वेळा देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानांवर छापा टाकला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवा यांनी जोरदार टोला लगावला आहे. मुंबई आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. “काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्यानं केंद्र सरकारकडून टाकण्यात येत आहे.

सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी यांसारख्या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीनं केला जात असल्याचं सध्या चित्र दिसत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्तांनी आरोप केले त्यातून देशमुख यांनी राजीनामा दिला होता. परंतु ज्यांनी ते आरोप केले ते अधिकारी कुठे आहेत याचा पत्ता लागत नाही. जबाबदार अधिकारी जबाबदार मंत्र्यांबाबत असे आरोप करतो असं चित्र यापूर्वी कधीही घडलं नव्हतं,” असं पवार यावेळी म्हणाले.
अनिल देशमुख यांच्या घरी आता पाचव्यांदा छापा टाकण्यात आला असून पाच वेळा छापा हा सीबीआयचा विक्रम असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. अनिल देशमुख यांची सध्या चौकशी सुरू आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा टाकण्यात आला. या एजन्सीचं मला कौतुक वाटतं. परंतु एकाच घरात पाच वेळा चौकशी करणं किती योग्य याचा विचार जनतेनं करावा असंही ते म्हणाले
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.