सांगली : दिवाळीपर्यंत आम्ही पुराव्यासह महाविकास आघाडी मधील मंत्र्याची सर्व घोटाळे सिद्ध करू असा इशारा किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. दिवाळीपर्यंत उद्धव ठाकरे यांची इलेव्हन सेना तुरुंगात जाईल, तसेच जितेंद्र आव्हाड यांनी देखील आता बॅग भरून बसावे असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीकडून नोटीस देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी सोमवारी बजरंग खरमाटे यांच्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव येथील वंजारवाडी भागातील फार्महाऊसची आणि अन्य ठिकाणच्या मालमत्ता पाहणी केली. त्यानंतर सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल देशमुख फरार, एक अनिल जेलच्या दारात, तर उद्धव ठाकरे यांचे दुसरे अनिल जेलमध्ये जाण्याची प्रकिया सुरू झालीय. खरमटेचा मुलगा प्रथमेशच्या नावाने अनेक व्यवसाय आहेत. आता गुरुवारी खरमटेची बारामती, मुळशी, पुणे शहरामधील मालमत्ताची पाहणी करणार आहे. त्यामुळे या साऱ्या मालमत्ता या खरमटेची की अनिल परब यांच्या हे परब हे सांगावे.
बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे विशेष सचिव होते. त्यामुळे 40 प्रॉपर्टीची बेहिशोबी साडेसातशे कोटींची मालमत्ता आहे,ती कुठून आली? याची मागणी आपण केली आहे. तर खरमाटे यांची ही संपत्ती आहे की,अनिल परब यांचा बेनामी पैसा आहे, लवकरच समोर येईल. पण ठाकरे सरकारचा एक अनिल तुरुंगाच्या दरवाजावर आहे,तर दुसरा अनिल म्हणजे अनिल परब मुहूर्त काढत आहे,अशा शब्दात भाजपाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे.
शिवसेनेवर निशाणा साधाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील 900 कोटी रुपयांचा घोटाळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच केला आहे,असा आरोप करत उद्धव ठाकरे देखील एक घोटाळेबाज आहेत. त्यामुळे या उद्धव ठाकरे यांच्या इलेव्हन सेनेच्या भ्रष्टाचाराचे घोटाळे आपण पुराव्यानिशी उघडकीस आणणार आहोत आणी दिवाळीपर्यंत ठाकरेची इलेव्हन सेना तुरुंगात जाईल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. त्याचबरोबर आता अनिल परब यांच्यावर कारवाई झालेली आहे. पुढच्या आठवड्यात भावना गवळी यांच्यावर कारवाई होणार आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचाही नंबर असून आव्हाड यांना आपली जाहीर नोटीस असणार आहे. त्यामुळे आव्हाड तुम्ही देखील आता बॅग भरायला लागा, असा इशारा किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.