अफगाणिस्तानमध्ये २० वर्षांनंतर तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. तालिबाननं सत्ता स्थापन करताच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. अफगाणिस्तमधून सोशल मिडीयावर येणारी दृश्य भयावह आहेत. खास करून काबुलमधून समोर येणारे फोटो आणि व्हिडीओ ह्रदय पिळवटून टाकणारे आहेत. अफगाणिस्तच्या या परिस्थितीवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी हळहळ व्यक्त केली आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअऱ केलीय. “जगभरातील महिला वेतन समानतेसाठी लढत असताना, अफगाणिस्तानातील महिलांना विकलं जात आहे. इथल्या महिला आणि अल्पसंख्यांकाची स्थिती अत्यंत वाईट आहे” असं म्हणत महिलांबद्दल दु:ख व्यक्त केलंय.

अभिनेत्री सोनी राजदान यांनी ट्वीट करत भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्या म्हणाल्या, “एक देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना दुसऱ्या एका देशाने आपलं स्वतंत्र्य गमावलं. काय जग आहे” असं ट्वीट केले आहे.
अभिनेत्री भूमि पेडणेकरने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत हे संपूर्ण चित्र काळजाला भिडणारं आहे. असं म्हंटलं आहे.

अभिनेता करण टॅकरने देखील इन्स्टा स्टोरीवरून संताप व्यक्त केलाय. यात तो म्हणाला, “अफगाणिस्तानमधील महिलांची स्थिती पाहून माणूसकीची लाज वाटू लागली आहे. जग शांत बसून फक्त तमाश पाहतंय.”
तर कंगनाने देखील अफगाणिस्तानमधील भीषण परिस्थितीवर भाष्य केलंय. ती म्हणाली, “आज आपण हे निमूटपणे पाहत आहोत पण उद्या हे आपल्यासोबतही होवू शकतं.” पुढे तिने लिहिलं, “हे खरंय की अफगाणिस्तानला आपली गरज आहे. पॅलेस्टाइन मुसलमानांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करणारे ड्रामेबाज आज अफगाणिस्तान मुसलमानांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करत आहेत. मी आपल्या सरकारचे आभार मानते की त्यांनी सीएए लागू केलं. ज्यामुळे सर्व हिंदू, शिख, जैन, इसाई आणि पारसी अशा धर्मींयांसोबतच शेजारी राष्ट्रांमधील इतर धर्मीयांच्या लोकांना आधार मिळू शकेल.” असं कंगना म्हणाली.

फिल्म मेकर आणि अभिनेत्री टिस्का चोप्राने काबुलमधील बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. पोस्टमध्ये तिने लिहिलं, ” काबुल खूपच सुंदर होतं. मी तिथेच मोठी झाले. मात्र सध्या जे घडतंय ते पाहून ह्रदय पिळवटून निघत आहे. एका सुंदर मात्र दु:खात असलेल्या देशासाठी प्रार्थना करतेय.” असं ट्वीट टिस्काने केलंय.
तर अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटरवर अफगाणिस्तानमधील विमानतळावरील एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत विमानतळावर देश सोडू पाहणाऱ्या लोकांची गर्दी दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करत स्वराने फक्त तुटलेल्या हार्टचे इमोजी दिले आहेत.
Credits and Copyrights – lokshahinews.com