पुणे : केंद्रीय सैनिक बोर्ड विभागाच्या (KBS) वतीने प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत माजी सैनिक किंवा वीर पत्नींच्या मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी इच्छुकांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. माजी सैनिक अथवा वीर पत्नी ज्यांच्या मुलांनी शैक्षणिक वर्ष २०२१ ते २२ अंतर्गत पदवी किंवा पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे केवळ त्यांनाच ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. यामध्ये एमबीए, बीडीएस, एमबीबीएस, एमसीए, बीसीए, एम.टेक, बी.टेक, बी.एड आदींचा समावेश आहे. तर शिष्यवृत्तीसाठी बारावी किंवा पदवी प्रशिक्षणात किमान ६० टक्के गुण असणे गरजेचे आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.