मुंबई : जगभरातील ३८ देशामध्ये पसरलेला कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतातही वेगाने फैलावत आहे. केवळ चार दिवसांमध्ये देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. २ डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनची बाधा झालेला पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासून ६ डिसेंबरपर्यंत या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ पर्यंत पोहोचली आहे.
राज्यात डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला बाधित आढळला. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ७ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. भारतीय वंशाची महिला २४ नोव्हेंबरला नायजेरियातून पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. या तिघींच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची तपासणी केली असता महिलेचा भाऊ, दोन मुली अशा सहा जणांनाही लागण झाल्याचे उघड झाले. पुण्यातील ओमायक्राॅन बाधित फिनलँड येथून परतला हाेता.
ओमायक्रोनचे संकट वाढत आहे. त्यामुळे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना नियमांचे कठोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात ओमायक्रोनचे वाढते रुग्ण पाहता एअरपोर्ट्स आणि इतर ठिकाणी कोविड टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्यात आले आहे अशी माहिती देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी दिली. ओमायक्रोनवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक होणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
पुढील दोन तीन दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन ओमायक्रोनचे संकट परतवण्यासाठी आणखी कडक निर्बंध घालायचे की नाही यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देखील आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.