मुंबई : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. डॉ. कलाम यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

‘माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. देशप्रेमासोबतच, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक असेच राहील. विचार प्रवण पिढी घडवण्यासाठी वाचन उपयुक्त ठरते.
त्यासाठी त्यांचा पुस्तकांवर प्रेम करा हा संदेश महत्वाचा आहे. त्यांच्या जयंती निमित्त साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्याही सर्वांना शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.